मुलांचे बोबडे बोल ऐकयला सगळेच आतुर असतात. पण हेच लहान मुलांचे गोड बोल जेव्हा वयानुसार त्यांच्या पालकांना ऐकयला मिळत नाहीत त्या पालकांना मुलांची खूप काळजी असते.
तुमचं मुलं शरीराने नीट वाढलच पाहिजे त्यासाठी गरजेच्या गोष्टी करायलाच पाहिजेत पण शारीरिक वाढी बरोबरच, भावनिक, शाब्दिक, सामाजिक वाढ सुद्धा गरजेची आहे.
शाब्दिक वाढीकडे अनेक पालक दुर्लक्ष करतात, काहींना शाळेमध्ये मुलाला घालेपर्यंत समजतच नाही काही आपल्या मुलाला हव्या त्या गोष्टी पण बोलता येत नाहीत, काहींची मुलं बोलत असतात पण वाक्य न बोलता गाणी म्हणत असतात, काहींच्या मुलांना अभ्यासाच्या सगळ्या गोष्टी येत असतात पण संवाद साधता येत नसतो, काही मुलं स्पष्ट बोलू शकत नसतात, काही शब्द बोलत असतात पण वाक्य बोलत नसतात असे वेगवेगळे प्रकार थेरपी च्या वेळेस पाहायला मिळतात.
मग आपल्या मुलाचा शाब्दिक विकास वयानुसार झालेला नाही हे समजल्यावरती अनेक वेग वेगळे मार्ग , उपाय, नको ते घरेलू नुस्के, औषधांचे (डॉक्टरांच्या सल्ला न घेता) प्रयोग, social media वरती विचारलेल्या आणि त्यातून कोणाला तरी आलेला अनुभव आवडून स्वतःच्या मुलासाठी तसाच ( चुकीचा , अर्धवट ) प्रयोग, गूगल वरची माहिती वाचून depression येणं, आपल्या मुलाला ऑटिसम पण झाला आहे का हे सारखं तपासून पाहणं, अनेकदा तो ऑटिस्टिक आहे असं स्वतःच निदान करणं ,भीती , काळजी , चिंता ह्यांनी व्यापून जाणं, इतरांचे नको ते सल्ले ऐकणं हे सगळं पालक खूप वेळेस करतात.
ह्यातल्या सगळ्याच गोष्टी वाईट आहेत असं नाही परंतु, तुम्हाला जेव्हा शाळेमधील शिक्षिका, किंवा इतर कोणी तुमच्या मुलाच्या शाब्दिक विकासाबद्दल विचारत असेल आणि त्यामुळे तुम्हाला काळजी वाटत असेल किंवा शंका येत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं कधीही चांगलं. assessment करून खात्री करून घेतलेली चांगली.
आज मी पालकांनी काय टाळायला हवं हे सांगत आहे.
१. अति प्रमाणात गूगल search – योग्य ते आणि योग्य तेवढी माहिती वाचलीत तर तुम्हाला काळजी वाटण्यापेक्षा माहितीत मिळेल. अनेक succes stories पाहून माझा मुलगा तर असं करत नाही, करेल का कधी असं बोलण्यापेक्षा मी सुद्धा माझी success story लवकरच बनवीन असा विचार करा आणि वेळ न वाया घालवता मुलावरती काम करा.
२. social media वरती नको ते सल्ले मागू नका- प्रत्येक मुलं वेगळं असतं. प्रत्येक मुलाचा प्रॉब्लेम वेगळा असू शकतो. एखाद्या व्यक्तीने casually घेतलेली गोष्ट तुमच्यासाठी खूप महत्वाची असू शकते. तुम्ही जर कोणाला सल्ला विचारलात, तर तो ऐकून निर्णय कायम नीट विचार करून घ्या.
३. कोणीतरी एखादं औषध मुलाला दिलं, क्रीम , तेल लावल म्हणून तुम्ही सुद्धा लगेच ते विकत आणून डॉक्टर किंवा तज्ज्ञ ह्यांना न विचारता मुलांना देऊ नका – तुमच्या मुलासाठी कोणतं औषध योग्य , अयोग्य आहे ते डॉक्टरांना ठरवूदेत. बाजारात मिळणारं प्रत्येक औषध हे तुमच्या मुलाला चालेल असं नाही.
४. मुलांना शाळेत घालायची अति घाई करू नका.- spech delay असलेली, adhd असलेली अनेक मुलं कुठेतरी engage राहावीत म्हणून त्यांना कमी वयामध्ये शाळेमध्ये घालू नका. मुलांना बेसिक गरजा सांगता येउदेत. पालक आणि मुलं त्यांचं नातं आधी दृढ होऊदेत मग त्यांना शाळेमध्ये घाला.
५. इतर मुलांबरोबर तुलना नको- थेरपी चालू असताना, शाळेमध्ये, सोसायटी मध्ये तुमच्या मुलाची तुलना इतर मुलांशी करू करून स्वतःला वाईट वाटून घेऊ नका. त्या ऐवजी तुमच्या मुलाचा starting point ओळखा आणि त्यानुसार त्याची तुलना करा. म्हणजे मुलाचे छोटे बदल सुद्धा तुम्हाला समाधान आणि ऊर्जा देतील-
स्पीच delay , ऑटिसम, attention deficit desorder वगैरे नावं ऐकून घाबरून जाऊ नका. तुम्हाला काहीहि प्रश्न असतील , ह्याबद्दल माहिती हवी असेल, assessment केल्यावरती report मधले मुद्दे समजले नसतील तर डॉक्टरांना किंवा तज्ज्ञांना जरूर विचारा. कोणत्याही आई ला स्वतःच्या मुलाला नक्की काय होत आहे हे नीट समजू शकत त्यामुळे सेल्फ doubt घेऊ नका.
पालक म्हणून तुम्हीच तुमच्या मुलाला बोलत करू शकता. proffesional help जरूर घ्या. थेरपिस्ट वरती थोडा विश्वास ठेवा. ह्या वर्षीचे हे छोटे बदल तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नक्कीच लवकर पोचवतील.
सकारात्मक विचार , ऊर्जा ठेवा म्हणजे तुमच्या मुलांचे गोड बोल लवकर कानी पडतील.
Happy Parenting!!!
ऋता भिडे
Child counselor, Neuro-linguistic master practitioner and Parent coach for speech delay and autism.