“ दर्शना…. “, १ मिनिटानंतर “दर्शना ssssss” अशी ६ ते ८ वेळा हाक मारल्यानंतर सुद्धा बाहेरच्या खोलीतून १५ वर्षाच्या दर्शनाचा काही प्रतिसाद न आल्यामुळे, प्रांजल बाहेर गेली आणि म्हणाली, “ तुला ऐकू येत नाहीए का मी हाक मारली ते?”
ह्यावर दर्शना अगदी काहीही वाटत नसल्यासारखी “ आलं ग ऐकू, तू सारखीच हाक मारत असतेस. सारखं सारखं काय तुला रिप्लाय देयचा.” असा म्हणाली.
तिला प्रांजल ने एक काम करायला सांगितलं तर म्हणाली “ मला वेळ नाहीए. Binge watching करायचं आहे.” अश्या उत्तरांना प्रांजल चा पारा अर्थातच चढत होता.
८ वर्षाच्या रुद्र ला अभ्यासाचा कंटाळा, काही खेळायचा कंटाळा, नवीन गोष्ट करून पाहायचा कंटाळा एकुणातच काहीहि करायचा कंटाळा येत होता. पण विडिओ गेम्स, online videos पाहणं हे मात्र तो तासन तास करत होता. तो खूप चिडतो, काहीही बोललं तर जा तुम्ही म्हणतो, शाळेत पण बाकी मुलांवर चिडचिड करतो, दादागिरी करतो असं त्याची आई session मध्ये सांगत होती.
घरी १२ ते १४ तास आई आणि बाबा काम करणारे, मग रुद्र सकाळी ७ ते संध्याकाळी ६ शाळा आणि मग नंतर डे care मध्ये, घरी आल्यावरती २ तास त्याच्यासाठी म्हणून मावशी येयच्या. त्या त्याला खाली खेळायला तरी नेयच्या किंवा क्लास ला नेयच्या. रात्री ८ ते ९ त्याची tution असायची. मग t.v. पाहत सगळ्यांच एकत्र जेवण आणि मग ११ ला झोप.
५ वर्षाची रोशनी बागेत खेळत असताना तिला सापडलेल्या फुलाबद्दल तिच्या फोन वर बोलत असलेल्या बाबांना सांगायला गेली, पण बाबांनी खुणेनी तू जा असं म्हंटल्यावरती sad face करून परत गेली. तिथेच ३ वर्षाचा एक मुलगा त्याच्या babysitter ला शाळेमध्ये आज काय घडलं ते सांगत होता आणि babysitter त्याचा विडिओ रेकॉर्ड करून घेत होती. मी कुतूहलापोटी त्या babysitter ला विचारलं कि तू ह्याचा विडिओ का घेत आहेस? तर म्हणाली मॅडम ना दाखवायला, नाहीतर त्या म्हणतात कि मला हा काहीच सांगत नाही आणि मॅडम घरी येई पर्यंत हा झोपून जातो. म्हणून मी व्हिडीओ बनवतीये. ह्याचप्रमाणे अगदी १० महिन्यांची बाळ पण त्यांच्या बाबागाडी मध्ये बसून पार्क मध्ये त्यांच्या बेबीसिटर बरोबर येत असतात.
आता ह्या सगळ्या उदाहरणांवरून तुम्हाला असं वाटेल कि म्हणजे आई नि जॉब किंवा व्यवसाय करायचाच नाही असं माझं मत आहे का. तर माझं असं अजिबात मत नाही. ह्या उलट बायका आई झाल्यावरती जास्त सक्षमपणे सगळं manage करू शकतात असं मला वाटतं. फक्त सध्या मला जी मुलं भेटत आहेत आणि जे पालक मुलांबद्दल सांगत आहेत त्या मध्ये मला पालकांना मुलांसाठी वेळ नाही असं जाणवत आहे.
आठ ते चौदा ह्या वयातल्या मुलांचे पालक टेन्शन मध्ये बऱ्याच कारणांमुळे आहेत आणि त्यामुळे त्यांच्या मुलांबद्दल complaints पण असतात. ह्या मुलांशी संवाद साधला तर समजलं कि आधीपासून माझी आई किंवा माझे बाबा असं मला करायचे नाहीत. मला जे हवं ते करून दिलं मग असं अचानक काय होतंय त्यांना ? थोडं chill करायचं ना. हल्ली काहीही झालं तरी त्याला मीच जबाबदार असते त्यामुळे मला काहीही ऐकायला आवडत नाही त्यांचं आणि आधी त्यांना माझ्यासाठी वेळ नसायचा आता मला नाही. हे उत्तर मला मिळालं.
म्हणजे पालक म्हणून आपण मुलांच्या बरोबर किती वेळ घालवला त्याहीपेक्षा किती quality time घालवला हे महत्वाचं आहे आणि ह्याची सुरुवात अगदी लहान बाळापासून होत असते. ह्याचा अर्थ मुलांच्या attention seeking behaviour ला पालकांनी कुरवाळत बसायला हवं असं अजिबात नाहीए. पण आपण आपल्या मुलांना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या काय हवं नको ते जसं पाहतो तसंच भावनिक दृट्या काय हवं नको तेही पाहणं गरजेचं आहे.
प्रत्येक वयोगटासाठी लागणारी पालकांची गरज आणि वेळ वेगवेगळा आहे. हा वेळ पालकांनी त्यांच्या मुलाची गरज समजून तो काढायला हवा. ह्या वेळामध्ये रोजच्या गोष्टी करत असताना, पालक आणि मुलं ह्यातला संवाद खूप महत्वाचा असतो. मुलांशी मूल होऊन खेळून पहा, त्यांना भावनिक आधार तर द्याच पण भावनांना पेलण्यासाठी सक्षम सुद्द्धा करा. काही वेळेस लहान मुलांना त्यांच्या भावना योग्य शब्दात व्यक्त करता येत नाहीत. अश्यावेळेस त्यांना लगेच तू stubben, clingy वगैरे आहेस असं labelling करून त्यांचा आत्मविश्वास कमी करू नका.
तुमची मुलं सुद्धा चुकत असतील पण ती शिकत आहेत हे कायम लक्षात ठेवा.
त्यांच्याकडून चुका झाल्या नाहीत तर ती शिकणारच नाहीत. त्यांच्या ह्या गोष्टीला योग्य वळणआणि साथ पालकांनी दिली तर त्यांच्याकडून परत परत चुका होणार नाहीत.
पालकांनी मुलांसाठी आणि मुलांनी पालकांसाठी थोडा वेळ देणं हि गरज आहे.
ह्यासाठी थोड्या मोठ्या मुलांबरोबर तुम्ही तुम्ही “ कॉफी विथ आई” किंवा “ कॉफी विथ बाबा” करून शकता. त्यांच्याबरोबर treaking ला, nature walk करायला जाऊ शकता. एखादा movie पाहायला जाऊ शकता. वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करू शकता. लहान मुलांबरोबर म्हणजे ७ वर्षांच्या आतल्या मुलांबरोबर त्यांच्या कल्पनाशक्ती मध्ये रमू शकता, एकादी activity ( शाळेच्या प्रोजेक्ट व्यतिरिक्त) त्यांच्या बरोबर करू शकता, मुलांबरोबर भटकंतीला, पिकनिक ला, खाऊ घेऊन बागेमध्ये जाऊ शकता. हे सगळं करत असताना फोटो , सेल्फी तर काढाच पण मुलांच्या मनात कायम जिवंत राहतील अश्या आठवणी निर्माण करा.
Happy Parenting!
Rhuta Bhide