सेंटर मध्ये पालकांमधली चर्चा चालू होती. 

पालक १ – “ कितीदा सांगितलं माझ्या मुलाला, पण माझं ऐकतच नाही. कंटाळा येतो तेच तेच सांगून, मग शेवटी हात उगारला, डोळे मोठे केले कीच काम होत. तसं मी सुद्धा थोडी तापट च आहे.”

पालक २- “ माझी मुलगी पण काही कमी नाहीए, तिचा  राग तर सारखाच नाकावरती असतो. नुसता t.v. बंद कर म्हंटल शाळेत जायला उशीर होतोय तर कसली फणकारली माझ्यावर?”

हे सगळं ह्या दोन पालकांची  मुलं समोर खेळत असताना चालू होतं. दोघी पालक मुलांबद्दल, त्यांच्या सवयी च्या बद्दल, रागाबद्द्दल , राग आल्यावरती वापरल्या जाणाऱ्या शब्दांबद्दल अगदी भरभरून बोलत होत्या. कोणाचं मुलं जास्त वाईट वागतं ह्याबद्दलची जणू दोघींमध्ये चढाओढच लागली होती. हि चढाओढ आता हळू हळू त्यांच्या स्वतःच्या आई बाबां पर्यंत जात होती आणि आवाज सुद्धा चांगलाच वाढला होता. नकळत त्यांच्या गप्पा उग्र बनल्या होत्या.

पालकांची मी ऐकलेली वाक्य – 

“ अरे , अक्कल आहे का तुला? बावळट. नीट लिहिता येत नाही?” “ मूर्ख आहेस अगदी. कस वागायचं हे कधी समजणार तुला? ती शेजारची मुलगी तुझ्यापेक्षा लहान आहे पण पहा जरा कशी व्यवस्थित वागते.” “ बिनडोक, काय लिहिलंय ते नीट वाच आता, नाहीतर ठेऊन देईन तुला दोन.” “ थांब, तुला आता बाथरूम मधेच बंद करते, आणि तिकडे स्पायडर सोडते” 

काही मुलांनी पालकांना ऐकवलेली वाक्य – 

“ हि गन पाहिलीत का ? आता, मी तुम्हाला ढिचक्यांव करतो आणि तुम्ही मरून जाल.” “ कळत नाही का तुम्हाला मी शांत बसा म्हणतोय?”, “ गप्प बस , मला येतंय नाहीतर मी आता तुला फटका मालिन.” “ आता मी तुला असं चेस्ट ला फाडतो आणि मग तुझ्यात रोबो बसवतो आणि मग मला हवं तसं वागायची कमांड देतो हीही”

मुलांचं आजूबाजूंच्या लोकांचं खूप निरीक्षण चालू असतं. त्यावर त्यांच्या परीने ते विचार करत असतात. खूपदा त्यांना हे विचार योग्य पद्धतींनी मांडता येतात पण खूपदा येत नाहीत, अश्यावेळॆस मुलं वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरतात.  

माझ्याकडे आलेल्या एका ५ वर्षाच्या मुलाच्या  मनात नेमकं काय चालू आहे हे समजून घेण्यासाठी त्याला एक कागद दिला. त्यावर तुला हवं ते छान चित्र काढायला सांगितलं. तोपर्यंत मी आणि त्याची आई बोलत होतो. चित्र काढून झाल्यावरती, मी त्याला म्हणाले काय काढलं आहेस? त्यावर तो म्हणाला, “ सगळं डार्क आहे, It’s no moon night.. ( howling sound effect), then इथे एक साधा माणूस आहे, त्याच्या समोर circle असलेला ब्लॅक मध्ये हा ghost आहे.” मी म्हणलं , “ हा माणूस झोपलेला का आहे?” त्यावर तो मुलगा म्हणाला, “ त्याचा  एका दुसऱ्या माणसांनी खून केला, शार्प knife नी, मग तो ghost बनला, मग दुसरी witch आली, तिनी त्या चांगल्या माणसामध्ये , त्याला फाडून त्याच्यामध्ये machine घातलं, आणि आता तो पण ghost च्या gang मध्ये गेला. त्याच्या आई बरोबर बोलत असताना समजलं कि हा दिवसभर ह्याच गोष्टींचा विचार करत असतो. एकटा असताना, लॅपटॉप वरती हे असले काहीतरी cartoon पाहतो आणि मग ह्याच्याशी जी मुलं खेळायला येतात त्यांना पण हे असलं शिकवतो. सुरुवातीला मुलं हे गम्मत म्हणून खेळली पण आता त्याच्याशी कोणी खेळत नाही. 

मुलांच्या मनावरती आजूबाजूच्या घटनांचा, संवादांचा, माणसांचा, मुलं कोणत्या गोष्टी पाहत आहेत त्यांचा ( स्क्रीन वरती सुद्धा) ह्याचा खोलवर परिणाम होत असतो. त्यांचे विचार, भावना, बोलणं ह्या गोष्टींवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. आपल्याबद्दल बाकीचे काय म्हणत आहेत, ह्यावरून खुपवेळेस मुलं स्वतःला तसंच accept करतात. म्हणजे, तुला XXX गोष्ट येत नाही असं म्हंटल तर काही  मुलं अभिमानाने ती गोष्ट मला येतच नाही हे इतरांना सांगतात. ह्याउलट पालकांनी तुला येत नसेल तर मी मदत करतो, आपण प्रयत्न करू असा attitude ठेवला तर मुलांना जी गोष्ट येत नसेल ती कालांतराने करता नक्की येऊ लागते. consistency is the key. 

त्यामुळे पालकांनी ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवायला हव्या. 

१. तुम्ही मुलांसमोर त्यांच्या विषयी इतरांना काय सांगता ह्याचं भान ठेवा. 

२. तुमची मुलं कोणता content पाहत , ऐकत आहेत ह्याकडे लक्ष द्या. 

३. मुलांना त्यांच्या वयानुसार content provide करा. 

४. मुलांना व्यक्त होण्याची संधी द्या 

५.  मुलांशी खेळताना, बोलताना , अभ्यास घेताना सकारात्मकता ठेवा. 

Happy Parenting!!!

Rhuta Bhide

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *