माझा आधीचा एक लेख वाचून एकीचा मला मेसेज आला. मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणेच माझ्या मुलामध्ये मला खूप गोष्टी जाणवत आहेत. तो बोलत नाही, काही हवं असेल तर शब्दांमध्ये सांगत नाही, खुणा करून हातवारे करून आम्हाला ओढून नेऊन सांगतो, खूप चिडचिड करतो वगैरे. घरचे म्हणाले, ३ वर्षापर्यंत मुलगे बोलतच नाहीत, नवरा म्हणतो तू उगाच खूप लक्ष देतेस, काही झालं नाहीए त्याला, पण बाकीच्या मुलांसारखा नाहीये मॅडम माझा मुलगा. खूप हिम्मत करून मी त्याच्या डॉक्टरांना vaccination च्या वेळेस त्याच्या बोलण्याबद्दल विचारलं तर ते म्हणाले त्याला थेरपी देयला सुरुवात करा. घरचे ऐकत नाहीयेत. मी जॉब करते पण एवढा पगार नाही, माझं भागतं. नवऱ्याला काहीच वाटत नाहीये. काय करू मी?
खूप पालकांना थेरपी म्हणजे एखादी घाबरण्यासारखी गोष्ट वाटते. ते आपल्यासाठी नाही… वगैरे विचित्र भावना आणि शंका मनात येतात. त्यामुळे आपल्या मुलासाठी जेव्हा डॉक्टर सांगतात की थेरपी ची गरज आहे तर नक्की थेरपी म्हणजे काय? काय असतं त्यात? त्यामुळे आपल्या मुलाला काय फायदा होणार? अश्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे. हा लेख सगळ्या पालकांसाठी महत्वाचा आहे. ज्यांच्या मुलांना काही त्रास नाही पण त्यांच्या आजूबाजूला अशी मुलं आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांच्या मुलांना काही concerns आहेत त्यांच्या साठीही.
जी व्यक्ती लहानमुलांच्या संपर्कात असते तिला त्या मुलामध्ये होणारे बदल जाणवत असतात, समजत असतात , दिसत असतात. ते बदल वयानुसार घडणं गरजेचं असत. तसं जेव्हा होत नाही त्याला delay म्हणतात. मग तो बोलण्याचा असेल, शारीरिक असेल , मेंदूच्या वाढीचा असेल, भावनिक असेल, सामाजिक असेल किंवा overall असेल. असा delay तुम्हाला जाणवला तर डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे. डॉक्टर assessment करून योग्य निदान करू शकतात, ह्या assessment मध्ये पालकांना प्रश्न विचारले जातात जेणेकरून मुलाची नीट माहिती समजते. त्याचबरोबर मुलाला त्याच्या वयानुसार वेगवेगळ्या activities, खेळ खेळायला दिले जातात. प्रत्येक गोष्टींचा response मुलं कसं देत आहे ह्याकडे पाहिलं जात. आणि मग मुलाला नक्की काय झालं आहे हे समजत. आता ह्या नंतर थेरपी ला सुरुवात होते. तुमच्या मुलाला कोणत्या गोष्टींची थेरपी गरजेची आहे ते assessment report मध्ये सांगितलेलं असतं. प्रत्येक मुलाच्या गरजेनुसार हि थेरपी ठरवली जाते. त्यात speech therapy, occupational therapy, applied behaviour therapy, sensory therapy, feeding therapy, cognitive behaviour therapy, remedial teaching, music therapy अश्या वेगवेगळ्या थेरपी चा समावेश असू शकतो. वरील सगळ्याच थेरपी द्यावा लागत नाहीत. पण ह्यापैकी एक किंवा एका पेक्षा जास्त थेरपी द्याव्या लागू शकतात. यातील बहुतेक थेरपी म्हणजे मुलांना वेगवेगळे खेळ, activities शिकवणं आणि करवून घेणं असतं. हे खेळ मुलांच्या मागे राहिलेल्या skills ना विकसित करण्यासाठी बनवलेले असतात.
ह्या थेरपी मुलांकडून करून घेण्यासाठी थेरपिस्ट असतात. प्रत्येक centre मध्ये मुलाच्या गरजेनुसार पालकांना काय गोष्टी करणे जरुरीचं आहे. थेरपीसाठी मुलांनी आठवड्यातून किती दिवसयेण्याची गरज आहे हे पालकांशी बोलून ठरवल जातं.
ह्या थेरपी मध्ये थेरपिस्ट सुरुवातीला मुलाला observe करतात आणि त्याच्या गरजेनुसार plan बनवतात. ह्या प्लॅन मध्ये कोणकोणत्या गोष्टी मुलामध्ये develop करायच्या आहेत त्याची मांडणी केली जाते आणि त्यानुसार मुलांना activities दिल्या जातात आणि त्या त्यांच्याकडून करून घेतल्या जातात. center मध्ये आल्यावर सुरुवातीला खूप मुलं नवीन वातावरण, activities बरोबर adjust व्हायला वेळ लावतात. पण हळू हळू मुलांना त्या गोष्टी येयला लागतात. पालकांनी अशा वेळेस मुलाला, थेरपिस्ट ला प्रोत्साहन दिलं पाहिजे. मुलांमध्ये लगेच फरक दिसून येत नाही. त्याला थोडा वेळ द्यावा लागतो. प्रत्येक मुलाच्या कलेने, त्याच्या स्पीड नुसार ह्या गोष्टी कराव्या लागतात.
थेरपी किती दिवस लागतात? हा प्रश्न खूप पालक assessment करण्याच्या आधीच विचारतात. प्रत्येक मुलाला थेरपी साठी वेगवेगळा वेळ लागतो. काहींना कमी तर काहींना जास्त. हा कालावधी तुमच्या मुलाच्या आकलन क्षमतेवर अवलंबून असतो. तसंच, पालक घरी मुलांबरोबर किती आणि कसा वेळ घालवत आहेत, गोष्टी सकारात्मकतेने करत आहेत त्यावर सुद्धा हा कालावधी अवलंबून असतो.
थेरपी महाग आहे. बहुतांश थेरपिस्ट किंवा थेरपी सेन्टर पालकांकडून सेशन नुसार फी आकारतात. ही फी ५०० रुपयांपासून ३५०० रुपये प्रति तास अशी असू शकते. फी हा मुद्दा थोडा वैयत्तिक असल्यामुळे पालकांनी थेरपिस्ट बरोबर चर्चा करून योग्य तो सुवर्णमध्य काढला तर मुलाला तुम्ही चांगल्या थेरपिस्ट कडे पाठवू शकाल.
थेरपी सेन्टर कसं असत? ही सेन्टर्स मुलांच्यासाठी असल्यामुळे त्यांना आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी म्हणजे खेळणी, activities करता लागणारी साधन, तिथे असतात. थेरपी सेंटर मध्ये स्वच्छता, हवा , कमी गोंगाट ( मुलांचे आवाज जास्त हवेत आणि मोठ्यांचे कमी) असायला पाहिजे. पालकांनी थेरपी सेन्टर ला भेट देणं खूप गरजेचं आहे म्हणजे ह्या गोष्टींची तपासणी करता येईल.
एका पेक्षा जास्त थेरपीची मुलांना गरज असेल, तर पालकांचा संभ्रम होऊ शकतो. नक्की प्रत्येक थेरपी मध्ये काय घेतात हे आपण पुढच्या लेखात पाहुयात.
तुम्ही एका पेक्षा जास्त थेरपी चालू केल्या तर त्यामध्ये बाकीच्या मुलांशी, थेरपिस्ट ची तुलना न करता तुमच्या मुलाच्या थेरपी बद्दल पॉसिटीव्ह approach ठेवा. तुम्हाला काही शंका असेल, काही प्रश्न असतील तर थेरपिस्टशी बोलणं सोयीचं होईल. तसं केल्यावरती तुमच्या शंकेचं निरसन होईल आणि मुलांमध्ये सुद्धा बदल करणं थेरपिस्टला सोप्पं जाईल. पालक आणि थेरपिस्ट ह्यांच्यातला संवादाचा दुवा कायम राहिला तर मुलांच्या प्रगतीचा वेग नक्कीच वाढेल.
शेवटी, पालक हा सगळा आटापिटा मुलांच्यासाठी, त्यांच्या बोलण्यासाठी करत असतात. तेंव्हा शंका कुशंका मध्ये शक्ती आणि वेळ वाया न घालवता मुलांशी खेळा, दिलेल्या activities आनंदानी करा आणि तुमच्या मुलाच्या थेरपिस्ट बरोबर संवाद साधा.
Happy Parenting !!
ऋता भिडे