आरडाओरड, आदळआपट करू नकोस. शांत बस. अश्या प्रकारच्या सूचना तुम्ही पण मुलांना देता का? पालकांनी काहीही सांगितलं तर तुमच्या मुलाची अग्रसेसिव्ह reaction येते का? आणि मग त्यावर तुमचा सुद्धा पारा चढतो का? मग मुलं असं का करतात हे समजून घेऊयात.
१. कृतीचे अनुकरण- मुलांना मोठ्या माणसांसारखं वागायचं असत, बोलायचं असतं. त्यामुळे आपण जे बोलत आहोत ते प्रत्येक वेळेस बरोबरच असेल असं नाही हि गोष्ट मुलांना समजत नाही. मग मोठी माणसं त्याला तू आगाऊ पणे बोलू नकोस असं म्हणतात. पण हे सगळं मुलं मोठ्यामाणसांकडूनच तर शिकत असतात.
२. खूप व्यस्त दिनचर्या – सध्या पालक आणि मुलं ह्यांना एकमेकांसाठी खूप कमी वेळ आहे. सकाळ पासून रात्री पर्यंत पालक आणि मुलं कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असतात. मग, ह्यामध्ये एकमेकांसाठी वेळ काढावा म्हंटला तरी अवघड होत. त्यात पालकांपासून मुलांपर्यंत सगळ्यांचं ताण तणाव आहेत. मग जर चुकून एखादा शब्द जर पालकांचा वाकडा बोलला गेला कि मग मुलांना सुद्धा खूप राग येतो आणि मग ती अग्ग्रेसिव्ह होतात. ह्यामध्ये एकमेकांचं ऐकून घेणं खूप कमी होत आणि गैरसमज वाढतात. त्यामुळे तुमचं म्हणणं मुलांना त्याच्या वयानुसार सांगा आणि मुलांचं सुद्धा ऐकून घ्या.
३. पालकांच्या अपेक्षा आणि मुलांच्या इचछा -मुलं आणि पालकांमध्ये जेव्हा हवा तेवढा संवाद होत नसेल तर विसंवाद वाढेल. पालकांच्या अपेक्षेप्रमाणे मुलं जेव्हा वागत नाहीत त्यावेळेस त्यांना सूचना , सल्ले मिळतात आणि मग ह्या सूचना, सल्ले जेव्हा मुलांना त्रासदायक वाटत असतात त्यावेळेस मुलांचं अग्ग्रेसिव्ह होणं दिसून येत. त्यामुळे मुलांना सूचना देयच्याच नाहीत का? असं पालकांना वाटू शकतं. पण सूचना द्या पण सारख्या नको. मुलांना तुम्ही दिलेल्या सूचनांवरती कृती करायला वेळ द्या. मुलांची कृती होई पर्यंत त्यांना तुम्ही सांगितलेल्या कामाची आणि ते काम कधी पूर्ण करायचं आहे ह्याबाबदल आधीच सांगा. म्हणजे तुमच्यामध्ये विसंवाद होण्याची शक्यता कमी होईल.
४. एखाद्या गोष्टीची भीती,धमकी सारखी दाखवली जात असेल तर – मुलांना जर कोणत्या गोष्टीची, व्यक्तीची भीती वाटत असेल तर, त्यांना कोणतीही सकारात्मक भावना मिळत नाही. जेव्हा मुलांना सुरक्षित भावना येत नाही त्यावेळेस मुलांची agressive reaction नक्कीच येऊ शकते. मुलांना सूचना देत असताना जर पालक धमकी देत असतील, एखाद्या गोष्टीची भीती दाखवत असतील तर त्यांना सुरक्षित वाटत नाही आणि त्यातून जी व्यक्ती धमकी किंवा भीती दाखवत आहे त्याव्यक्तीवरती fight हि मेंदूची reaction येण्याची शक्यता निर्माण होते. अश्यावेळेस, मुलं स्वतःला protect म्हणजेच मुलांचा मेंदू स्वतःला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतो. पण नक्की कश्या पद्धतीने ह्याला सामोरं जायचं हे समजतं नसल्यामुळे मुलांची agressive reaction येऊ शकते.
५. एखादी गोष्ट जमत नसेल आणि त्याबद्दल मोटिवेशन दिलं जात नसेल तर- तुला काहीच जमत नाही, लिहिता येत नाही, वाचताना लक्ष नाही अश्या गोष्टी जर पालक सारखं बोलत असतील तर मुलांना नवीन गोष्ट करायला प्रेरणा मिळणार नाही. त्यातून पुन्हा निराशा येऊन येणार राग मुलं दुसयांवर काढू शकतात.
मुलं agreesive झाल्यावरती त्यावर react करण्यापेक्षा त्यांना response दिलात तर त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. मुलांना कोणत्या गोष्टीमुळे राग येतो हे समजून घ्या आणि त्यावर लवकरात लवकर काम करा.
Happy Parenting!
ऋता भिडे
Child counselor, NLP master practitioner, ASD clinical specialist, and parent coach.