आपल्या मुलांची सर्वांगीण वाढ व्हावी असं सगळ्याच आई बाबांना वाटतं. मग मुलांची सर्वांगीण वाढ होते कशी हे देखील सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे! जन्माला आल्याच्या पहिल्या क्षणापासून ते शेवट पर्यंत आपण जे काही शिकतो ते इतर लोकांना किंवा आपल्या आजूबाजूच्या गोष्टींना बघून, वाचून, ऐकून वगैरे शिकतो. लहानपणी जेव्हा आपल्याला वाचता येत नसतं, अगदी लहानपणी जेंव्हा बोलता देखील येत नसतं, तेव्हा लहान मुलं केवळ आपल्या आजूबाजूच्याना पाहून गोष्टी शिकत असतं. मग त्यात चालणं, हाताची हालचाल करणं (म्हणजे गोष्टी धरणं, ओढणं वगैरे), आवाज काढायला शिकणं, भाषा शिकून बोलायला लागणं या अशा अनेक महत्वाच्या गोष्टी येतात.

याचा अर्थ एखाद्या लहान मुलाला जितक्या हालचाली, शब्द, आवाज, ऊच्चार, भावना, रंग, आकडे, भाषा वगैरे पाहायला/अनुभवायला मिळतात तेवढी त्या मुलाची सर्वांगीण वाढ चांगली होते. मुलांना या सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त पहायला/अनुभवायला द्यायचा सगळ्यात सोप्पा मार्ग म्हणजे पालकांनी त्यांच्या बरोबर खेळणं, गप्पा मारणं आणि वेळ घालवणं.

कामाच्या व्यापामुळे, बदलत्या जीवनशैली मुळे पालकांना मुलांबरोबर वेळ घालवायला अवघड जातं. मग अशा मुलांच्या सर्वांगीण वाढीत कमतरता राहणं हे अगदीच स्वाभाविक बनतं. ज्या घरांमध्ये मुलांचा वेळ पालक किंवा इतर लोकांबरोबर व्यतीत व्हायच्या ऐवजी स्क्रीन समोर बसण्यात जातो, त्या मुलांच्या बाबतीत तर ही गोष्ट अधिकच प्रकर्षाने दिसते. मुलं एकदा शाळेत जायला लागली की तिथे मुलांना काही नवीन पाहायला, अनुभवायला मिळू लागतं पण ते नेहमी पुरेसं असतंच असं नाही.

मुलांची आणि पालकांची हीच गरज लक्षात घेऊन आम्ही घेऊन आलो आहोत आमचा Development Booster Plan. आमच्या या सेवेचा फायदा घेणाऱ्या पालकांना आम्ही पुरवतो असे खेळ आणि activities ज्यामुळे पालकांना दिवसातली अगदी पंधरा मिनिटं वापरून देखील त्यांच्या मुलांच्या सर्वांगीण वाढीला booster देता येतो. या प्लॅनच्या सभासदांना केवळ ४९९ रुपयात मिळतात रोज नव्या ऍक्टिव्हिटीची आयडिया तेही सलग तीन महिने! त्याच बरोबर सर्व सभासदांना सलग तीन महिने दर आठवड्याला नवीन worksheets देखील मिळतात जी त्यांच्या मुलांच्या मेंदूला चांगलाच खुराक देतात! तर आमच्या या सेवेचा लाभ नक्की घ्या आणि आपलं पॅरेंटिंग सोप्प बनवा!